"BORN TO SHIVAJI AND HIS FIRST WIFE, SAIBAI, SAMBHAJI WAS DESTINED TO CARRY FORWARD THE MARATHA EMPIRE. HE WAS BORN AT PURANDAR FORT AND RAISED BY HIS PATERNAL GRANDMOTHER, JIJABAI. AS PART OF THE TREATY OF PURANDAR, SHIVAJI SENT SAMBHAJI TO LIVE WITH RAJA JAI SINGH OF AMBER AS A POLITICAL HOSTAGE, WHERE HE WAS RAISED AS A MUGHAL SARDAR AND SERVED IN AURANGZEB’S COURT.
AFTER SHIVAJI’S DEATH, SAMBHAJI FACED OPPOSITION FROM HIS STEPMOTHER, SOYARABAI MOHITE, WHO ATTEMPTED TO INSTALL HER SON, RAJARAM, AS THE RIGHTFUL HEIR. ESCAPING IMPRISONMENT, SAMBHAJI ASCENDED THE THRONE ON 20 JULY 1680. A BRILLIANT STRATEGIST AND A FEARLESS LEADER, HE PROVED HIMSELF WORTHY OF RULING THE MARATHAS, THOUGH HIS REIGN WAS SHORT-LIVED.
THIS BOOK DELVES INTO HIS REMARKABLE LIFE, SHEDDING LIGHT ON THE RULER HE TRULY WAS."
"’राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ’संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ’छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे.
एक-दोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ’संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब - या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची!
रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ’बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्याले की, मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते; हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका तर खरीच; पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी! "